आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

188 कोरोना रुग्ण आढळले:मूकबधिर शाळेतील चार विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

उमरगा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात जुलैच्या २८ दिवसात १८८ कोरोना रुग्ण आढळले आहेत. दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शहरातील मूकबधिर शाळेतील चार विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

तालुक्यात जून महिन्यात ४० कोरोना रुग्ण आढळले होते. गुरूवारी (दि.२८) तपासणीस पाठवलेल्या १३९ स्वॅब अहवालातून ११ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील मूकबधिर शाळेत चार, उपजिल्हा रुग्णालयाजवळ, आरोग्य नगर तर काळे प्लॉट आणि ग्रामीण भागात येळी, दाळिंब, जेवळी व रुद्रवाडी, बसवकल्याण प्रत्येकी एक असे एकूण ११ जण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या चौथ्या लाटेत आतापर्यंत २२८ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

शहरात १०२ तर ग्रामीण भागात १२६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी १७५ जण कोरोनामुक्त झाले. ५३ रुग्ण मुरुम ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात उपचार व गृहविलगीकरणात आहेत. चौथ्या लाटेत आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...