आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:रुग्णांची मोफत रक्त तपासणी; कौडगाव येथील आरोग्य शिबिरात 240 रुग्णांची तपासणी

ढोकी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील (बावी) येथील आरोग्य शिबिरात २४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. कौडगाव ग्रामपंचायत व एव्हिएटर सोशल युथ फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि.१२) मोफत सर्वरोग निदान शिबिर घेण्यात आले.

शिबिरात १७ मोतीबिंदू, ११ हृदयविकाराचे, २ अँजिओग्राफीच्या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंद करण्यात आली. यावेळी रुग्णांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली. मोफत औषधोपचार करण्यात आले. गरजेनुसार रुग्णांचे अल्प दरात एक्सरे काढण्यात आले. ज्यांना चष्मा लागला आहे त्यांना अल्प दरात चष्मे पुरवण्यात येणार आहेत. डॉ. धनंजय पडवळ, डॉ. किरण कुलकर्णी, डॉ. महेश पाटील यांच्या टीमने रुग्णांची तपासणी केली. यावेळी सरपंच पवन ढेकणे, सुनिल ढेकणे, बाबुराव कदम, प्रशांत पडवळ, राहुल पवार, वैभव मुंडे, सुहास माळी, सुशांत पडवळ, रवी मोरे, अजिंक्य मोरे सूरज हाजगुडे, तेजस ढेकणे, बालाजी डावकरे, सुमित डावकरे, रमेश ढेकणे, महेश हिंगमिरे, विठ्ठल कोकाटे, फकीर कांबळे, गणेश कदम, औदुंबर ढेकणे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...