आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटरी क्लब:कृत्रिम हात बसविण्यासाठी मोफत शिबिर ; सोलापूर व रेडक्रॉस साेसायटीतर्फे आयोजन

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राेटरी क्लब ऑफ साेलापूर, इंडियन रेडक्राॅस साेसायटी व राेटरी क्लब ऑफ उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक सुटसुटीत एलएन ४ कृत्रिम हात बसविण्यासाठी माेफत शिबीराचे आयाेजन करण्यात आले आहे. नाेंदणीसाठी अंतिम तारीख २० सप्टेंबर असून, हे शिबीर रविवार,२५ सप्टेंबर राेजी सोलापुरातील डफरीन चाैकातल्या दमाणी रक्त केंद्रात होणार असल्याची माहिती उस्मानाबाद रोटरी क्लबच्या वतीने देण्यात आली.

एखाद्या कारखान्यामध्ये किंवा चरख्यामध्ये हात कट झाला अथवा अपघातात काेपऱ्यासूनच हात तुटलेला असल्यास, अशा व्यक्तींना दैनंदिन जीवन जगताना दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते.जीवन जगणे असह्य हाेते. मात्र कृत्रिम हात बसवल्याने दिव्यांगावर मात करीत संबधित व्यक्ति व्यवस्थित कामे करु शकताे.वाहनही चालवू शकताे.ते बसविण्यासाठी लाभार्थीला हाताच्या काेपराखाली ४ इंच भाग असणे आवश्यक आहे.शिबीरात मुलांना व प्राैढांनाही हात बसवले जाणार आहेत. हे शिबीर पूर्णपणे माेफत असून संबधित व्यक्तींनी आपल्या हाताचा फोटो व संपर्क दुरध्वनी नंबरवर राेटरी सदस्यांना व्हाॅटस्अपवर पाठवणे आवश्यक आहे.

ब्रिजकुमार गाेयधानी (9422065796), सुहास लाहाेटी (9422457323),चित्रसेन राजेनिंबाळकर (79728 00527),धनंजय वाकुरे (9422464774), बाळासाहेब देशमुख (94224 65277), रणजित रणदिवे(94049 55959) शिबीरात साेलापूर, उस्मानाबाद शहर, जिल्हा व कर्नाटक जिल्ह्यातून व्यक्तिंची नाेंद हाेण्याची शक्यता असून एकूण १०० व्यक्तींना अशाप्रकारचे मेकॅनिकल हँड बसवून देण्याचा मानस असल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख ब्रिजकुमार गाेयदानी व बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले.अशाप्रकारचे शिबीर राेटरीद्वारा सुमारे ५ वर्षापूर्वी आयाेजित करण्यात आले हाेते. त्यात ५७ लाभार्थ्यांनी फायदा घेतला हाेता. उपक्रमासाठी राेटरी क्लब ऑफ साेलापूरचे सचिव सुरज तापडिया, एलएन ४ प्रकल्प समन्यवक समितीचे सदस्य पीडीजी डाॅ.राजीव प्रधान, सलाम शेख, विशाल वर्मा,सुहास लाहाेटी,राजगाेपाल मिणियार,जयेश पटेल, किशाेर चंडक, खुशाल ढिया, संदीप जव्हेरी तसेच राेटरी क्लब उस्मानाबादचे अध्यक्ष प्रमाेद दंडवते, सचिवा डॉ.अनार साळुृंके यांच्यासह कुणाल गांधी, दिग्विजय पाटील, अभिजीत पाटील, रणजित रणदिवे आदींची समिती कार्यरत आहे.

बातम्या आणखी आहेत...