आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद : येथील तेरणा ट्रस्टच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी (दि २०) तालुक्यातील नाईचाकुर येथे महिला केंद्रात सर्वरोग निदान अन् औषधोपचार शिबिरास उत्साहात सुरुवात झाली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. माजी सरपंच तथा संचालक यशवंत पवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी रंजना जमालपुरे, सिध्देश्वर माने, शरद पवार, डॉ. संतोष सनातन, राम पाटील, सतीश माने, सत्यवती इंगळे, राऊ पवार, नाना पाटील, यशोदा पवार उपस्थित होते. सर्वरोग निदान आरोग्य शिबिरात वेगवेगळ्या प्रकारच्या सुमारे १७१ रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. १६ रुग्णांना पुढील उपचारासाठी नेरूळ मुंबई येथील तेरणा मेडिकल कॉलेज येथे पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी बालरोगतज्ञ डॉ. अनिश मैनी, क्षत्रिय, स्त्रीरोगतज्ञ डॉ. नम्रता गरजे, डॉ. विजयसिंह राऊत, डॉ. सुफियान शेख, डॉ. दिनेश पडवळ आदींनी उपस्थित राहून शिबिरात तपासणी करून औषधोपचार केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब सूर्यवंशी, चैतन्य पवार, जिनेंद्र वनकुद्रे, हिरा पंडित, धर्मा सूर्यवंशी, माधव करणुरे आदींनी पुढाकार घेतला. प्रा. रफिक शेख यांनी प्रास्ताविक केले.सिध्देश्वर माने यांनी सूत्रसंचलन केले. गुणवंत पवार यांनी आभार मानले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.