आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिसांच्या धकाधकीच्या जीवनामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते, हे लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक पोलिस अधिकारी, अंमलदारांना अपचन, गॅस, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार इत्यादी प्रकारचे आजार तसेच समस्या असल्याचे तपासणीमध्ये दिसून आले.
त्या कर्मचाऱ्यांना आयुर्वेदिक उत्पादनांचे मोफत वाटप करण्यात आले. सदर आजार दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उत्पादने वापरणे आवश्यक असल्याचे पोलिस अधीक्षकांनी लक्षात घेऊन टोरेन्ट पावर समन्वय, ६०० तपोवन, अंबावाडी, अहमदाबाद या कंपनीच्या सामाजिक दायीत्वातून ट्राईब मॅजिक कंपनीची आयुर्वेदिक उत्पादनेउस्मानाबाद पोलिस दलातील अधिकारी, अंमलदारांसाठी उपलब्ध करून गुरुवारी (दि.१०) पोलिस मुख्यालयातील अलंकार सभागृहात पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णीयांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, टोरेन्ट पावर लि. कंपनीचे अधिकारी वर्ग तसेच उस्मानाबाद पोलिस दलातीलअधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.