आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरगरिबांना दिलासा:जिल्ह्यातील 11 लाख 62 हजार लाभार्थींना मोफत धान्य; गहू, तांदळाचा समावेश

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ११ लाख ६२ हजार ६८९ लाभार्थींना डिसेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य स्वस्त धान्य दुकानातून मिळणार आहे. यात गहू आणि तांदळाचा समावेश आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मंगळवारी त्या बाबतचे आदेश काढले आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यासाठी प्रति लाभार्थी दोन किलाे गहू तर तीन किलो तांदूळ या प्रमाणे धान्य वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच नोव्हेंबर महिन्यातच पुरवठा दारांना पुरवठा करण्याचे आदेश दिले आहे. कोरोना काळात केंद्र शासनाकडून ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील या लाभार्थींना दर महा मोफत धान्य उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यानुसार आता पर्यंत मोफत धान्य देण्यास मंजुरी देण्यात आली होती. डिसेंबर महिन्याबाबतचे आदेश नसल्याने पुढील महिन्यात मोफत धान्य वाटप बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र, मंगळवारी (दि.१) पुरवठा विभागाने आदेश काढून लाभार्थींना मोफत रेशनचे धान्य उपलब्ध करुन देण्याबाबत स्पष्ट केले आहे. तसेच संबंधीत लाभार्थींना हे धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी पुरवठा दारांना आदेशही दिले आहेत. त्यासाठी आवश्यक गोदाम निहाय पुरवठा करण्याचे नियोजनही संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील साडेअकरा लाख पेक्षा जास्त लाभार्थींना देण्यात येणार असल्याचे समोर आले. राज्य शासनाने दिवाळीत आनंदाचा शिधा देऊन लाभार्थींची दिवाळी गोड केली. तसेच केंद्र शासनाकडून डिसेंबर महिन्याचेही मोफत धान्य उपलब्ध करुन देत गोर गरीब लाभार्थींना दिलासा दिला असल्याचे समोर आले.

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना लाभ गरीब कल्याण अन्न योजनेतून जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब लाभ योजनेतील लाभार्थींचा यात समावेश करण्यात आला आहे. कार्ड धारक संख्या कमी असली तरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाच किलो प्रमाणे हे धान्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थी संख्या अधिक असल्याचे दिसून येते. तहसीलदार, गोदामपालावर जबाबदारी

सर्वांना धान्य : मंजूर करण्यात आलेल्या धान्य संख्येनुसार संबंधीत तालुक्याच्या तहसीलदार आणि संबंधीत गोदामपालावर धान्याची उचल करण्याची आणि त्याचे वितरण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांना धान्य मिळणार असल्याचे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...