आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिसांच्या वेळी-अवेळीच्या, धकाधकीच्या कर्तव्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावरील जबाबदाऱ्या, ताण ह्या बाबी विचारात घेत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पाेलिस कर्मचारी अधिकाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी पोलिस व ‘तेजस्विनी हेल्थ केअर’ यांच्या संयुक्त विद्यमाने १२ डिसेंबरपर्यंत जिल्हाभरातील पोलिसांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले आहे.
सोमवारी याचा शुभारंभ कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. यात संपूर्ण शारिरीक तपासणी ॲक्युप्रेशर व फिजिओथेरपी उपचार, संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीद्वारे उपचार तसेच फुफ्फुस, हृदय गती, रक्त शर्करा, यकृत, मुत्रपिंड, त्वचा रोग, हाडांचे विकार, स्त्रियांचे आजार इत्यादी महत्त्वाच्या तपासण्या केल्या जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.