आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:केंद्र प्रमुखाच्या जबाबदारीतून‎ शिक्षकांना मुक्त करा‎ ; केंद्रप्रमुख व‎ प्रभारीमध्ये वादाची‎ ठिणगी‎

उस्मानाबाद‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियमित केंद्र प्रमुख व प्रभारी केंद्र‎ प्रमुखांमध्ये वादाची ठिणगी पडली‎ असून यासंदर्भात शिक्षकांना‎ केंद्रप्रमुखांच्या जबाबदारीतून मुक्त‎ करण्याची मागणी त्यांनी केली‎ आहे. नियमित केंद्र प्रमुखांनी एका‎ संघटनेच्या माध्यमातून यासंदर्भात‎ मुख्य कार्यकारी अधिकारी,‎ शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर‎ केले आहे.‎ जिल्हा परिषद शिक्षण विभागात‎ प्रशासकीय व्यवस्था करण्यासाठी‎ ८० पैकी तब्बल ६१ ठिकाणी प्रभारी‎ केंद्र प्रमुख नियुक्त करण्यात आले‎ यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य‎ कास्ट्राईब कल्याण महासंघाच्या‎ माध्यमातून सीईअो व‎ शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले‎ आहे.

यावर राज्य अतिरिक्त‎ महासचिव हरिभाऊ बनसोडे,‎ जिल्हा उपाध्यक्ष सुधिर जाधवर‎ यांच्याही सह्या आहेत. शिंदे‎ यांच्याकडे संघटनेचे जिल्हाध्यक्षपद‎ आहे. यामध्ये त्यांनी अशा‎ शिक्षकांवर इंग्रजी, विज्ञान,‎ गणितासारखे महत्त्वाचे विषय‎ शिकवण्याची जबाबदारी असल्याचे‎ कारण सांगत त्यांचा केंद्र प्रमुखांचा‎ पदभार काढून त्यांना पूर्ण शिक्षक‎ म्हणून काम करण्याची संधी‎ देण्याची मागणी केली आहे. शिंदे‎ यांनी उघडपणे प्रभारी केंद्र‎ प्रमुखांच्या विरोधात भूमिका घेतली‎ आहे. यावर प्रशासनाच्या‎ निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.‎

बातम्या आणखी आहेत...