आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खो-खो स्पर्धा:स्पर्धेसाठी मैदान तयार करण्यापासून ते मैदानावर विजयी जल्लोष करेपर्यंत महिला टीमने कामे केली

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील महिला खेळाडूंनी विविध स्तरावर खो- खो खेळून उस्मानाबादचे नाव देशाच्या खेळ इतिहासात कोरले आहे. त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन वेळी खेळास फारसे प्राधान्य नव्हते. त्यात मुलींनी खेळणे याकडे कुणाचा कल नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करुन खो-खो चे मैदान तयार करुन त्यावर नियमित सराव करुन मैदान मारुन राष्ट्रीय स्तरावरील पदकं मिळवण्याचे काम केले असल्याचे समोर आले.

शहरात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील महिला व पुरुष खो-खो खेळाची स्पर्धा पार पडत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक महिला खेळाडूंची माहित घेत त्यांचे अनुभव घेण्याचा प्रयत्न दिव्य मराठी कडून करण्यात आला. त्यांच्याशी संपर्क साधून जेंव्हा त्यांना त्यांच्या खेळाबाबत माहिती विचारली असता त्यांच्या डोळ्यात एक चमक निर्माण झाली होती. २५ – ३० वर्षांपूर्वी मैदान गाजवलेल्या या महिला सध्या गृहिणी वाटत असल्या तरी, त्यांच्यात अद्यापही एक खेळाडू असल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे त्यांच्यात त्या काळी असणारा आत्मविश्वास अद्यापही कायम असल्याचे तसेच त्यांच्या बोलण्यातूनही ते समोर येत होते. विशेष म्हणजे या सर्व खेळाडूंचा सत्कारही या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजक तथा भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी मान्यवरांच्या हस्ते करुन घेतला. या सत्काराबाबत सर्व महिला खेळाडूंनी जाधव यांचे आभार मानत आमच्यावेळी आपल्या सारखा प्रशिक्षक आणि मार्गदर्शक मिळाला असता तर, आमची आजची स्थिती यापेक्षा वेगळी असती, अशा पद्धतीचे मत व्यक्त केले. तसेच शहरात होणाऱ्या या स्पर्धांमुळे शहरासह ग्रामीण भागातील जास्तीत जास्त खेळाडू नव्याने निर्माण होणार असल्याचेही सांगितले. अनेक खेळाडूंना आपले अनुभव आणि आताची स्थिती अशी सांगड घालत असताना केवळ आमच्या वेळी इतक्या सुविधा आजिबात नव्हत्या. इतकेच शब्द बाहेर पडत होते. मैदानावर पडल्यावर अथवा स्नायू दुखावल्यास तत्काळ आराम देणारा कोणताही पेन रिलिफ स्प्रे नव्हता. आमचा स्वत:चा आत्मविश्वास आणि जिंकण्याची धडपड हेच औषध असल्याचेही त्यांनी सांगितले.

सात वर्षे देशाच्या टीमचे प्रतिनिधीत्व शालेय स्तरावरुन मी सर्वात कमी वयाची खेळाडू म्हणून खेळत होते. मराठवाडा विद्यापीठाच्या संघात असताना ऑल इंडिया संघाचे कॅप्टन म्हणून प्रतिनिधीत्व केले. त्यावेळी मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब आदी राज्याच्या संघासोबत खेळलो. अनेक यश आले. मात्र, त्यावेळी आम्हाला डॉ. जाधव यांच्या सारखे मार्गदर्शन मिळाले नाही. तसे कुणी मिळाले असते तर, आमची आजची स्थिती वेगळी असती. सिमा धस, खेळाडू - १९८३ -८४

मी एकटीच खेळाडू म्हणून निवड जेंव्हा मी खो-खो खेळायला लागले तेंव्हा शाळेतून माझी एकमेव निवड होत होती. अंतर विद्यापीठ स्तरावर आम्ही सामने खेळले. विशेष मुलांच्या शाळेत क्रीडा शिक्षिका आहेत. विशेष मुलांच्या अॅथेलिटीक स्पर्धा दुबईमध्ये पार पडल्या. त्यांची देशाची कोच म्हणून मी काम केले. आता सध्या माझ्या शाळेच्या मुलांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. तसेच सद्या विशेष मुलांच्या भारतीय अॅथलिट्स स्पर्धेच्या निवड समितीत माझी निवड झाली आहे. कविता कोळगे, १९८० ते ९३

या खेळात रस वाढत गेला प्रारंभी सरांनी सांगितले खेळायचे आहे, म्हणून सहज खेळलो. यात चांगली कामगिरी करत राहिल्याने वर्षभर शाळेत खेळलो. त्यामुळे या खेळात रस वाढत गेला. नंतर आंतरविद्यापीठ स्तरावरही खेळायला मिळाले. पण दरवेळी घरातून हवा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यावेळी शाळेतील मैदान तयार करण्यापासून ते मैदान मारण्यापर्यंत आमची तयारी होती. आम्ही आमच्या हिंमतीवर राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. लग्नानंतरही राष्ट्रीय स्तरावर खेळले. उमा जाधव, १९८७ ते ९५

आमच्या विचाराच्या पुढचा खेळ जेंव्हा आम्ही खेळत होतो, तेंव्हा आ म्हाला आता मिळतात, तेवढ्या सुविधा आजिबात मिळत नव्हत्या. खेळात आम्हाला त्यावेळी मैदान, शाळेतून एक किट इतकच मिळत होते. तसेच बाहेर सुविधा व जेवण असायचे. आता मात्र, मुलांना मैदानासह थेट मॅट आली आहे. पूर्वी १२ खेळाडू होते. आता १५ झाले आहेत. आमच्या विचारा च्याही पुढे हा गेम गेला आहे. शहरात आयोजित स्पर्धांमुळे ग्रामीण भागातून अधिक चांगले खेळाडू निर्माण होतील. वृषाली बळे

बातम्या आणखी आहेत...