आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारास्त भाव धान्य दुकानदारांना कमिशन वाढून द्या, मोफत धान्याचे प्रलंबित बिल तत्काळ वितरीत करा यासह विविध मागण्यांसाठी रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने उमरगा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार जानेवारी २०२३ पासून रेशन दुकानदारांनी लाभार्थींना एकाच योजनेचे धान्य मोफत वाटप करण्याचे आदेश दिल्याने दुकानदारांना एकही रुपया मिळणार नाही.
महिनाभर पैसे न मिळाल्यास दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, स्टेशनरी व इतर खर्चाचे ओझे असह्य होणार आहे. मोफत धान्य विक्रीचे कमिशन दुकानदारांना महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मिळावे.
वाहतुकीत होणाऱ्या धान्य गळतीमुळे धान्य कमी येते, त्याचा आर्थिक फटका दुकानदारांना बसत आहे. सर्व्हरच्या समस्येमुळे पॉश मशीन व्यवस्थित दुरुस्ती करण्याचे नियोजन करावे. इतर राज्यांप्रमाणे दुकानदारांना दरमहा मानधन द्यावे, २५ हजार रुपयांप्रमाणे मानधन द्यावे. सर्व सुविधा ऑनलाइन असताना ऑफलाइन रजिस्टर नोंदवही किंवा रेकॉर्ड ठेवण्याची सक्ती करू नये, प्रति क्विंटल धान्याची दोन किलो तूट ग्राह्य धरावी.
शेतकरी लाभार्थींचे धान्य त्वरित उपलब्ध करुन द्यावे. या मागण्यांचा विचार न केल्यास फेब्रुवारीचे धान्य उचल व वाटप होणार नाही. तसेच रास्त भाव दुकानदारांना गॅस एजन्सी, सीएससी सेंटर व लाइट बिल भरणा केंद्र मिळावे. निवेदनावर तालुका संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, उपाध्यक्ष शिवानंद बब्बे, सचिव बालाजी पोतदार, सहसचिव उज्वलाताई बिराजदार, कार्याध्यक्ष श्रीधर पवार, दुकानदारांच्या स्वाक्षरी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.