आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:होळकर चौक सुभोभीकरण 50 लाखांचा निधी मंजूर

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.ओबीसी जनमोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे निधीची मागणी केली होती. पडळकर यांनी सुशोभीकरण करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंर्गत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

सचिन शेंडगे यांना परळीतील धनगर समाजाचे नेते शिवदास बिडगर यांनीही सहाकार्य केले. चौकासाठी मिळलेला निधीतून लवकरच सुशोभीकरण होणार आहे. जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेंडगे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...