आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:भावी शिक्षकांनी राष्ट्रीय विकासात हातभार लावावा

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावी शिक्षकांनी आपल्यातील कौशल्य विकसित करून राष्ट्रीय विकासात हातभार लावावा, असे उद्गार डाएटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनूरे यांनी अध्यापक विद्यालयात आयोजित पालक मेळाव्यात काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. एच. पवार होते. दरम्यान महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माळी सिद्धेश्वर व साक्षी पवार या प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दयानंद जटनूरे, डॉ. प्रकाश कांबळे, दिगंबर इगवे उपस्थित होते. कार्यक्रमात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध शाखांत कार्य केलेले व्यंकटेश पुराणिक यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याबद्दल यू. पी. झालटे, प्राध्यापक एस. बी. पोतदार, डॉ. बी. आर. शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. प्राचार्य पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. पल्लवी मते यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...