आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांना निवेदन:गडकोट-भुईकोट किल्ल्यांचे जतन, दुरुस्ती, संवर्धन करावे

परंडा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिक गडकोट-भुईकोट किल्ल्यांचे जतन, दुरुस्ती व संवर्धनातही विविध मागण्यांसाठी छत्रपती शासन ग्रुप व शिवप्रेमींच्या वतीने तहसीलदार रेणुका दास देवडीकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की, पन्हाळागड, विशाळगड आदींसह गडकोट-भुईकोट किल्ल्यांची पडझड झाली आहे. जतन दुरुस्तीसही गड संवर्धनासाठी पुरातत्व विभाग, शासन स्तरावरुन देखभाल होणे गरजेचे आहे. गड किल्ल्यांच्या संदर्भात स्वतंत्र मंत्रालय उभारावे. पुरातन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गडांची डागडुजी करावी. गडांना ऐतिहासिक स्थळाचा दर्जा मिळावा. गडकोट संवर्धन केले जावे व जपणूक करुन ऱ्हास थांबवावा. गड कोट किल्ल्यांच्या ठिकाणी मद्यपान व पशुहत्या, कोणत्याही प्रकारचे चुकीचे कृत्य होऊ नये, अशी सुरक्षितता असावी.

स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या मावळ्यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण व देखभाल करावी. संवर्धनासाठी शासनाने स्वतंत्र बँक खाते काढावे. गडकिल्ल्यांचा पर्यटनासाठी नाही तर ऐतिहासिक स्थळांसाठी आणि अस्मितेसाठी विकास केला जावा. गड संवर्धन करण्यासाठी पुरातत्त्व खात्याने ठोस पावले उचलावी. निवेदनावर छत्रपती शासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राण जीत गवंडी, समाधान कोळेकर, बालाजी भागडे, राजेश कारंडे, विकी माळी, अप्पा पांढरे, शिवाजी देवकर, जयराम धनवे, सुनिल घोगरे, रत्नामाला निकाळजे, कानिफनाथ सरपणे, अतुल झिरपे, कमलेश भागडे, गणेश वरपे, गणेश चोपडे, अप्पा भाडे आदींसह शिवप्रेमींच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...