आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन:मावस भावाचा खून करणारे आरोपी गजाआड; आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

तामलवाडी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) शिवारात सोलापूर-धुळे महामार्गवर भर रस्त्यावर ज्ञानेश्वर नानासाहेब करंडे यांचा धारदार कत्तीने खून केल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी मुख्य सुत्रधार रामेश्वर खोचरेसह त्याची बहिण अनिताला तुळजापूर पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. दरम्यान, आरोपींनी तुळजापूर येथील सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तुळजापूर तालुक्यातील मसाला (खुर्द) येथील ज्ञानेश्वर नानासाहेब करंडे या युवकाचा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गवर काका का ढाबा समोर गुरुवारी भर रस्त्यावर खून करण्यात आला होता. सख्ख्या मावस भावानेच ज्ञानेश्वरचा खून केला होता. खून करणाऱ्या आरोपीचे त्याच्या मावस बहिणीसोबत अनैतिक संबंध होते. याला विरोध असल्यामुळे समाजात झालेल्या बदनामीपोटी मृताने आरोपीचा उस्मानाबाद येथील खुला प्लॉट मावस बहिणीच्या नावाने करायला लावला होता. याचाच राग मनात धरुन आरोपी रामेश्वर खोचरे याने ज्ञानेश्वर करंडेचा भर रस्त्यात खून केला होता.

खून करताच आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. रामेश्वर खोचरेसह त्याचा भाऊ परमेश्वर, वडील संभाजी व बहिण अनिता भोसले यांच्या विरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीच्या शोधासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या आदेशावरून व पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली दोन शोधपथके तयार करण्यात आले होते. पथकाने अनिला भोसले हिला औसा येथून तर रामेश्वर खोचरे याला उस्मानाबाद येथून अटक केली.

बातम्या आणखी आहेत...