आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे वाढले असून पोलिसांकडून त्यांच्यावर नियमित कारवाई करण्यात येत आहेत. उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यांतर्गत जुगार विरोधी कारवाई दरम्यान पथकाने रविवारी शहरातील एलआयसी कार्यालयाजवळ अचानक छापा टाकला. यावेळी तेथे नामदेव नारायण गव्हाणे (रा. सांजा) व संतोष लिंबा राऊत (रा. आंबेवाडी) हे दोघे चक्री ऑनलाइन जुगार चालवण्याच्या साहित्यासह २३ हजार १७० रुपयांच्या ऐवजांसह आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात जुगाराचे प्रमाण वाढले असून त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.