आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कळंब, ईट येथे जुगारावर छापे; साहित्य, रोख जप्त

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब येथील शेरेगल्लीतील अरबाज शेख २७ ऑगस्टला साडेसहा वाजेच्या सुमारास मोहेकर कॉलेजसमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह १४४० रुपये रोख बाळगलेले कळंब पोलिसांना आढळले. भूम तालुक्यातील ईट येथील ज्योतीराम चव्हाण पाच वाजेच्या सुमारास गावातील मारुती मंदिरामागील एका शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह ६४० रु'. रोख बाळगलेले वाशी पोलिस ठाण्याच्या पथकास आढळले.

यावरुन पोलिसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त केली. तसेच नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम- १२ (अ) अंतर्गत संबंधीत पोलिस ठाण्यांमध्ये येथे गुन्हे नोंदवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...