आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:अर्धवट कामे केलेल्या ईट महावितरणचा ग्रामस्थांकडून गांधीगिरीने अभिनव निषेध

ईट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईट महावितरण अंतर्गत ईटसह आसपास असणाऱ्या १४-१५ गावाना विदयुत पुरवठा केला जातो.त्याबरोबर पखरूड व जोतीबाचीवाडी या गावानाही येथूनच विदयुत पुरवठा केला जातो.याच पखरुड फिडरवरुन ईट मधील निम्मा भाग शिक्षक काॅलनी, ईट जातेगाव रोड लगत ,जिल्हा परिषद शाळाचा परिसर आदी ठिकाणी याच पखरूड फिडर वरुन इरिगेशन डी पी वरून हा विदयुत पुरवठा केला जातो.मात्र मागील दोन वर्षा पासून अत्यंत कमी दाबाने हा पुरवठा केला जात आहे.त्यामुळे येथील नागरिकाची मोठी गैरसोय होत आहे.

त्याबरोबर येथील हा वीज पुरवठा सतत खंङित होतो.यामुळे येथील नागरिकानी नवीन डी पी साठी अनेक वेळा मागणी केली. याठिकाणी एक २५ एच पी चे तीन कान्ड मंजूर करण्यात आले आहे.मागील तीन महिन्यापुवीॅ हे काॅन्ड बसविण्यासाठी पोल ही उभारण्यात आले.मात्र त्यावर काहीच बसविण्यात आले नाही. येथील नागरिकाच्या सततच्या पाठपुरव्या नंतर या ठिकाणी २५ एच पी चे काॅन्ड बसविण्यात आले मात्र हे तीनही काॅन्ड बसून एक महिन्याचा कालावधी होऊन गेला तरी बाकीचे काम अजूनही पुर्ण झाले नाही.या कामासाठी महावितरण कार्यालयाकडून गेल्या महिनाभरा पासून नुसत्या तारखा दिल्या जात आहे.

यामुळे येथील महावितरणच्या भोंगळ कारभारास वैतागून येथील नागरीकांनी उभा करण्यात आलेल्या पोल व रिकाम्या बाॅक्स ला हार व फुले वाहुन गांधीगिरीनी आंदोलन केले.पखरूड फिडर वरून ईट मधील इरिगेशन डी पी वरून निम्म्या गावास विज पुरवठा केला जातो.मात्र तो पुरवठा अगदी कमी दाबाने होता. तसेच सतत येथील वीज पुरवठा काही कामासाठी बंदही केला जातो.महावितरण कङून या नागरिकाची मागणी नंतर या ठिकाणी २५ एच पी चे तीन काॅन्ड मजूर करण्यात आले होते.

तीन महिन्यापुवीॅ महावितरण कडून हे काॅन्ड बसविण्यासाठी पोल उभा करण्यात आले होते.मात्र बाकी काहीच काम करण्यात आले नाही. येथील नागरिकाच्या सततच्या पाठपुरव्यामुळे महावितरण गेल्या महिन्यापुवीॅ या पोल वर तीन काॅन्ड व फ्यूज बाॅक्स बसविण्यात आले .नंतर संबधित गुत्तेदार व महावितरण कडून चालढकल करण्यात आली.चार महिने होत आले तरी महावितरण कडून येथील वीजपुरवठा सुरळीत व काम पुर्ण करण्यात आले नाही.म्हणून येथील नागरिकानी दि २ रोजी महावितरणच्या भोगळ कारभारास ञस्त होऊन या उभा करण्यात आलेल्या पोल व रिकाम्या असलेल्या बाॅक्सला हार व फुले वाहुन गांधीगिरीनी आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थितीत होते.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अनंत डोके म्हणाले की, येणाऱ्या ४-५ दिवसात अपूर्ण असलेले काम पूर्ण करून सुरळीत वीज पुरवठा करावा. अन्यथा रस्ता रोको करण्यात येईल.जे काही होईल त्यास पुर्णता महावितरण व संबधित गुत्तेदार जाबबदार राहतील.

अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून घेऊ
संबधित गुत्तेधाराकङून निम्मे काम करण्यात आले आहे.थोडे काम बाकी आहे. गुत्तेदारास कल्पना देवून ते अपुर्ण असलेले काम पुर्ण करून ३-४ दिवसात त्या ठिकाणीचा वीजपुरवठा केला जाईल .नागरिकाची होणारी गैरसोय दुर केली जाईल. प्रशांत शिंदे , कनिष्ठ अभियता महावितरण, ईट

बातम्या आणखी आहेत...