आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:गणेगाव जि.प. शाळेमध्ये स्कूल किटचे वाटप

गणेगाव2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालुक्यातील गणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू, होतकरु, गरीब,अनाथ,विद्यार्थ्यासाठी सेवा उद्योग फाउंडेशन मुंबई याच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले. प्रारंभी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास इंगोले यांनी सरस्वतीचे पूजन करून उद्‌घाटन केले. यावेळी सेवा सहयोग फाउंडेशन जिल्हा समन्वयक उपक्रमशील शिक्षक विनोद सुरवसे, सरपंच समाधान कुंभार,उपसरपंच प्रशांत राजे जाधव, गजानन चव्हाण,रावसाहेब मोरे,बाळासाहेब पाटील आदी मान्यवरांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक विष्णू पवार याच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये ८२ विदयार्थ्याना वही, पेन, रजिष्टर, चिञकलेची वही, चिञपेटी, कंपासपेटी ग्राफ बुक आदी साहित्याचा समावेश होता. दहावीतील ओम कोकाटे, साक्षी हुके, प्रणिता बोरकर, प्रज्ञा मोरे व मंथन परिक्षेत राज्यस्तरीय गुणवता यादीत २७ वी तर तालुक्यामधून प्रथम क्रंमाक मिळविलेली इयत्ता ३ री मधील सायली पाटील या यश मिळविलेल्या गुणवंत विदयार्थ्याचा गौरव करण्यात आला. तसेच ग्रामस्थाच्या वतीने ही विद्यार्थ्याना सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू पवार, अनिल दुधाळ,संतोष तोडकरी, मनिष खैरे,दत्तात्र्य गुंजाळ, विद्या वैदय, संगीता शिंदे आदीनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्र्य गुंजाळ व मनोगत संतोष तोडकरी यानी केले शेवटी आभार शाळेचे मुख्याध्यापक विष्णू पवार यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...