आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:उस्मानाबादेत 2 ठिकाणी गणेश विसर्जनाची सुविधा; अग्निशमन, आरोग्य यंत्रणेला सज्जतेच्या सूचना

उस्मानाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील घरगुती आणि सार्वजनीक गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाची मुर्ती विसर्जन करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने हातलाई देवी तलाव आणि समता नगर मधील विसर्जन विहीर या दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी आवश्यक सर्व कामे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरु हाेते. त्यामुळे गणेश भक्तांना सकाळी दहा वाजेपासूनच मुर्ती विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

यंदा गणेश भक्तांचा उत्साह मोठ्या प्रमाणात असल्याने नगर पालिकेकडून घरोघरी जाऊन अथवा रथात मुर्ती संकलन करण्याचे काम थांबवले आहेत. भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाला स्वत: विसर्जित करायचे असल्याने तशी व्यवस्था नगर पालिकेने करुन दिली आहे. त्यानुसार समता नगर मधील विसर्जन विहिर परिसरात सफाई करुन बॅरिगेटींग करण्यात आले आहेत. त्याच बरोबर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. तसेच पोहण्यात पारंगत असलेल्या काही व्यक्तींची तेथे निवड करण्यात आली आहे.

याच बरोबर नगर परिषदेचे २४ कर्मचारी -अधिकारी, खासगी संस्थेचे दहा जणांसह पोलिसांचाही सहभाग तेथे राहणार आहे. त्याच बरोबर हातलाई देवी तलाव परिसरात टॉवर, विद्युत व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याच बरोबर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकासह पोलिस आणि नगर पालिकेचेही कर्मचारी अधिकारी येथे उपस्थित राहणार आहे. या ठिकाणीही टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याच बरोबर दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. येथे नगर पालिकेचे १७ तर खासगी स्वयंसेवी संस्थेचे दहा जणांचा समावेश आहे. त्याच बरोबर पोलिसांचे पथकही असणार आहे.

विसर्जन स्थळी सुविधा
हातलाई देवी तलाव येथे पाच लाइफ जॅकेट, बोटीची सुविधा,२ ट्रॅक्टर, २ घंटागाडीची सुविधा,पिण्यासाठी पाणी, नियुक्त कर्मचारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना जेवण, नाष्टा, चहा,अग्निशमन विभागाची गाडी,आरोग्याचे पथक संपर्कात असेल. अशीच सुविधा विसर्जन विहिरी जवळही असेल.

बातम्या आणखी आहेत...