आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजसेवा:शिराढोणच्या गणेश मंडळाने घेतली चार क्षयरोग रुग्णांची जबाबदारी

शिराढोण21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिराढोण ता.कळंब येथील श्री विठ्ठल रूक्माई गणेश मंडळाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेत क्षयरोग मुक्त भारत या अभियानाचा लोकसहभाग दायित्व म्हणून क्षयरोग मुक्त करण्यासाठी चार क्षयरोग रुग्णांची एक वर्षाची पोषण आहाराची जवाबदारी स्वीकारली आहे. या आदर्श उपक्रमाची दखल घेत जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ.आर.के. अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच शिराढोण येथे येवून या गणेशमंडळातील सर्व सदस्यांचा सत्कार व प्रशस्तीपत्र देवून गौरव केला. या कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग धिकारी डाॅ.आर.के.अन्सारी यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.जे.एन.सय्यद, शिराढोण येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.शगुप्ता सय्यद, तालुका पर्यवेक्षक सचिन परदेशी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनेश कावळे, तुकाराम लोहार, विश्वनाथ देशपांडे, सुरेश यादव, मुबारक पठाण, परीचारीका उषा दुगाने, छाया लवटे, समिर सौदागर आदींची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ.अन्सारी यांनी उपस्थितांना क्षयरोग व कुष्ठरोग या जनजागृती वर मार्गदर्शन केले. या आवाहना नंतर या कार्यक्रमात एम. एच. २५ हेल्पिग हॅंड च्या माध्यमातून कुलदिप गायकवाड यांनी कळंब तालूक्यातील सर्व क्षयरोग रुग्णंाना निक्षय मित्र मिळवून देण्याची जवाबदारीही घेतली. त्यासोबतच गावातील रणजीत गवळी, डाॅ.अमोल यादव, फेरोज पठाण व औदुंबर काळे यांनी निक्षय मित्र होवून प्रत्येकी एक क्षयरोग रूग्णाची पोषण आहाराची जवाबदारी स्वीकारली. यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील, राहूल ओमने आदी ग्रामस्त व युवकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...