आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम प्रबोधन करणारे कार्यक्रम घ्यावेत

नळदुर्ग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रमांसह प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावे, असे आवाहन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथे शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, महावितरणचे अभियंता प्रवीण गायकवाड, माजी नगरसेवक शहेबाज काझी, मुश्ताक कुरेशी, शफीभाई शेख, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक बसवराज धरणे, संजय बताले, विनायक अहंकारी, महालिंग स्वामी, नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक मुनीर शेख, विकास सोसायटीचे संचालक विनायक पुदाले, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर घोडके, मनसेचे जिल्हा चिटणीस ज्योतिबा येडगे, मनसेचे शहर चिटणीस प्रमोद कुलकर्णी, आपचे शहराध्यक्ष वसीम पठाण, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या शाहेदाबी सय्यद, विशाल डुकरे, शाम कनकधर अतुल हजारे, धनंजय डुकरे, सागर हजारे, सतीश पुदाले, बंडप्पा कसेकर, अजहर शेख, मुद्दस्सर शेख, संतोष मुळे, उमेश जाधव, योगेश सुरवसे, प्रतीक भोसले, जिविशाचे धनंजय वाघमारे, पोलिस कॉन्स्टेबल रसूल पठाण, सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

सिद्धेश्वर गोरे म्हणाले की, गणेशोत्सवात सर्वांनीच उत्सवाचे पावित्र्य जपावे. सर्वांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. यावेळी कमलाकर चव्हाण, विनायक अहंकारी, संजय बताले, शहेबाज काझी यांनी मनोगत व्यक्त करताना गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याची ग्वाही दिली. भैरवनाथ कानडे यांनी आभार मानले.

उत्कृष्ट गणेश मंडळांना परितोषिक
नळदुर्ग शहरातील गणेश मंडळांसाठी नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या गणेश मंडळांचा पारितोषीक देऊन सन्मान करण्यात येणार आहे, असे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...