आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद उस्मानाबादमार्फत २०१७ साली स्वच्छ आणि हागणदारी मुक्त गाव योजना राबवली गेली. यात प्रत्येक गावाने सहभाग नोंदवला आणि काही गावांना पुरस्कार मिळाले व काही गावात स्वच्छ व हागणदारीमुक्त गाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे असे फलक लावले गेले. तेरखेडा गाव हे ४ ऑक्टोबर २०१७ रोजी स्वच्छ आणि हागणदारी मुक्त गाव घोषणा करण्यात आली व फलक उभा केला गेला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी फलकाला हार घालून फोटोही काढले. गावकऱ्यांनी गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा शपथाही घेतल्या. पण स्वच्छता फलक आज कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला आहे. गावकरी स्वतः चे घरदार अंगण परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तेथील कचरा फलकाच्या पुढ्यात आणून टाकतात.
टाकलेला कचरा कोण तरी गावकरी जाता येता पेटवून देतो. कचरा ओला सुका मिक्स असल्यामुळे धूर निर्माण होतो. त्यामुळे धुराचा त्रास टाळण्यासाठी शेजारील दुकानदाराना मास्क वापरावा लागत आहे. येथील दर्ग्या समोरही घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
प्राथमिक शाळेतही कचराकंुड्या नसल्याने रोगराईची भीती
टाकलेला कचरा कोण तरी गावकरी जाता येता पेटवून देतो. कचरा ओला सुका मिक्स असल्यामुळे धूर निर्माण होतो. त्यामुळे धुराचा त्रास टाळण्यासाठी शेजारील दुकानदाराना मास्क वापरावा लागत आहे. येथील दर्ग्या समोरही घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
कचराकुंड्या ग्रामपंचायत कार्यालयात : गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयाच्या चॅनल गेटच्या आत ज्या कचराकुंड्या धूळ खात पडल्या आहेत, त्या, कचरा साचतो त्याठिकाणी ठेवल्या तर स्वच्छता राहिल. प्राथमिक शाळेतही हीच अवस्था आहे. तिथेही कचरा कुंडी नसल्यामुळे कचरा इतरत्र टाकला जातो.
कचराकुंडीच उपलब्ध नसल्यामुळे गैरसोय
गावकरी असो किंवा विद्यार्थी असो त्यांना कचराकुंडीच उपलब्ध नसल्यामुळे कचरा कुठेही टाकला जातो, तरी त्याची सोय होणे आवश्यक आहे. कचराकुंडी उपलब्ध नसल्याने केवळ अस्वच्छताच होते असे नाही तर गावाच्या परिसरात रोगराईही निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाले तर या प्रकाराला कोण जबाबदार? तेव्हा ही गैरसोय दूर होण्यासाठी काही प्रयत्न होणे आवश्यक आहे. गणेश घुले ,अध्यक्ष, शालेय शिक्षण समिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.