आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा पांचाळ यांचा प्रथम क्रमांक:राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धा

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे यांच्या संकल्पनेतून गौरी लक्ष्मी सजावट स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आलेले होते. स्पर्धेत शंभरहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. गौरी महालक्ष्मी स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवारी (दि ९) माजी पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या हस्ते विजेत्या युवती व महिलांना करण्यात आले.

प्रा. बिराजदार यावेळी म्हणाले की, महिला हीच नव उत्क्रांतीची प्रेरक असून आजतागायत सर्वच पातळीवर अग्रस्थानी महिलांच आहेत. महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी आयोजित गौरी महालक्ष्मी सजावट या स्पर्धेत आकर्षण पर्यावरण संवर्धनासह प्रबोधनात्मक आदी देखावे करून नवनिर्मितीचा संदेश दिला आहे. ऑनलाईन स्पर्धेत मुरुम शहराचा सुंदर असा देखावा सादर करणाऱ्या शिल्पा दिलीप पांचाळ यांचा प्रथम क्रमांक आल्याने पैठणी साडी देवून गौरव करण्यात आला. गुंजोटी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा रेखाताई नंदकुमार पवार यांनी काळाची गरज ओळखून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देवून अतिशय सुंदर देखावा सादर केल्याने त्यांना द्वितीय क्रमांक चांदींची गणेश मुर्ती व कदेरच्या अनुजा ज्ञानेश्वर गायकवाड यांचा इतरापेक्षा थोडा वेगळेपणा जपत बसलेल्या हलता गौरी महालक्ष्मी देखाव्यास तृतीय क्रमांक चांदीचे महालक्ष्मी मुर्ती बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.

भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रदेश युवक सचिव दिग्विजय शिंदे, तालुकाध्यक्ष संजय पवार, जिल्हा युवक कार्याध्यक्ष बाबा जाफरी, विधानसभा अध्यक्ष बाबा पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सुनीताताई पावशेरे, तालुका उपाध्यक्ष विष्णु भगत, तालुका सरचिटणीस धिरज बेळंबकर, प्रदीप चालुक्य, प्रा दत्तात्रय इंगळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...