आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भूम तालुक्यात गावरान आंबा होतोय दुर्मीळ, केशर लागवडीला शेतकऱ्यांची पसंती

भूम4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बदलत्या हवामानाने मोहर गळती, यंदा केशर खाणार भाव

बहुतांश शेताच्या बांधावर हमखास दिसणारी गावरान आंब्याची झाडे गेल्या काही वर्षांत दुर्मीळ होऊ लागली आहेत. त्यातच गेल्यावर्षी उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाने व नंतर बदलत्या हवामानामुळे यंदा गावरान आंबा मिळणे कठीण बनले आहे . त्यामुळे यंदा केशर आंबा भाव खाण्याची शक्यता आहे. रस व लोणच्यासाठी बहुदा गावरान आंबाच वापरला जातो. पूर्वी जमिनीचे अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी होती.

तालुक्यात गावोगावी अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे शेतातील बांधावर मोठ्या प्रमाणावर आंब्याची झाडे असायची. तालुक्यातील काही गावांमध्ये तर आंब्याच्या झाडांवरून त्या शेतकऱ्याची ओळख असायची. बदलत्या काळात जमिनींचे क्षेत्रही घटले आणि शेतकऱ्यांनी गावरानऐवजी कलमी आंब्याकडे मोर्चा वळवला. कलमी आंब्याला पहिल्याच वर्षी आंबालागतो तर दोन ते तीन वर्षानंतर तर भरपूर आंबे येतात. त्यांची गोडीही गावरान आंब्याच्या तोडीची असते. याउलट गावरान आंब्याला कधी दोन तर कधी तीन वर्ष बहारच येत नाही. त्यातच गावरान आंब्यावरही बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे. यंदा पावसाळा लांबला. त्यानंतरही सतत हवामान बदलत राहिल्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावरील आंब्याचा बहार गळून गेला. त्यामुळे यंदा गावरान आंबे दुर्मीळ झाले आहेत.

माझ्याकडे केशर, रत्ना या आंब्याची बाग आहे. गावरान आंब्याला क्षेत्र जास्त लागते. त्या तुलनेत कलमी आंब्यांना कमी जागा लागते. तसेच हवामानाकडे लक्ष देऊन आवश्यकतेनुसार फवारणी तर चांगले उत्पादन होऊन पैसे मिळतात. - संजय त्रिबंक गाढवे, शेतकरी, भूम.

शेतकरी केशर आंब्याला प्राधान्य देत आहेत. त्यापाठोपाठ लंगडा, आम्रपाली यांची लागवड होत आहे. या नव्या वाणांमुळे उत्पादनही चांगले मिळते. जमीनही कमी लागते. यंदा हवामानामुळे आंब्याची फळधारणा वेगवेगळ्या कालावधीत झाली. त्याचा परिणाम उत्पादनावरही होऊ शकतो. -शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी, भूम.

बातम्या आणखी आहेत...