आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:लोहाऱ्यात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास सोमवारी घागर मोर्चा

लोहारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रभाग क्रमांक ३ व ४ मधील पाणीपुरवठा पुढील तीन दिवसांत सुरळीत करावा अन्यथा सोमवारी (दि.२९) नागरिकांच्या वतीने नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेवक प्रशांत काळे यांनी दिला. त्यांनी शुक्रवारी (दि.२६) नगरपंचायत कार्यालयास निवेदन दिले, त्यात म्हणले आहे की, दोन महिन्यांपासून तीन व चार प्रभागात पाणीपुरवठा बंद आहे.

मुख्य जलवाहिनी फुटल्याचे कारण सतत सांगितले जात आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. पाणी नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. पाणीपुरवठा बंद असल्यामुळे मानसिकता हतबल होत आहे. त्यामुळे तात्काळ पाण्याची सोय करण्याकरिता आपल्या स्तरावरून योग्य ते नियोजन करण्यात यावे. अन्यथा सोमवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...