आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:उस्मानाबादेत गझल मुशायरा

उस्मानाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गझल मंथन साहित्य संस्था शाखा उस्मानाबाद यांच्या वतीने रविवारी २६ जून रोजी गझल मुशायरा झाला. हा मुशायरा दोन सत्रांमध्ये घेण्यात आला. यावेळी अनेक नामवंत गझलकार सहभागी झाले होते. वाह वाह मुकर्रर या आवाजाने सभागृह दुमदुमून गेले होते. यावेळी रसिकांकडून जी दाद मिळत होती ती खरोखरच वाखाणण्याजोगी होती.

अनामिक वाढली होती किती हुरहूर जाताना तशी मग भेटले नाही तुला मी दूर जाताना या प्रा. विद्या देशमुख यांच्या ग़झलेने सभागृहामध्ये एक प्रकारची निशब्द शांतता पसरली तर गझलकार शेखर गिरी यांची सात वाजल्यानंतर ही गझल रसिकांना हसवून गेली. प्रमुख पाहुणे गझलकार प्रा, डॉ. अविनाश कासांडे,यशवंत मस्के, शिल्पा भांडारी यांच्या तरन्नुम गझलांनी रसिकांची मने जिंकली बाप लेकीचं नातं सांगणारी मुशायरा अध्यक्ष गझलकार डॉ.राज रणधीर सर यांची गझल,थाटात चांदण्याची बघ पालखी निघाली,तितक्यात एक तारा पडला गळून खाली ही गझल रसिकांचे आकर्षण ठरली.

यावेळी बाळ पाटील, भागवत घेवारे,डॉ.संजय सोनटक्के,किरण देशमाने,मीना महामुनी,स्नेहलता झरकर, डॉ,अनार साळुंके,डॉ.रेखा ढगे, युवराज नळे.सुनिता गुंजाळ, राजेंद्र अत्रे, अमृता अमोल,अनिल ढगे, यांनीही सुंदर गझला सादर केल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना गझल संस्था जिल्हाध्यक्ष अनिल ढगे यांनी संयोजनाची भूमिका मुशायरा संयोजका प्रा विद्या देशमुख यांनी विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकारा सुनिता गुंजाळ यांनी केले तर आभार डॉ. रेखा ढगे यांनी मानले. गझल मुशाय-याचे सुत्रसंचलन गझलकार युवराज नळे आणि राजेंद्र अत्रे यांनी बहारदार पणे करून मुशायऱ्यात रंगत आणली.