आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तके भेट:भाटशिरपुरा शाळेला २०० पुस्तकांची भेट

कळंब6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भाटशिरपुरा झेडपी प्रा. शाळेच्या ग्रंथालयासाठी शिक्षणप्रेमी नागरिकांनी २० हजारांची पुस्तके शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, शब्द संग्रहात वाढ होऊन अनेक विषयाची माहिती मिळावी, थोर नेत्यांची चरित्र ज्ञात व्हावी, स्पर्धा परीक्षेत त्याचा उपयोग व्हावा, यासाठी १७ जणांनी एकत्र येत २० हजारांचा निधी जमा केला व त्यातून शाळेतील ग्रंथालयासाठी २०० पुस्तके खरेदी करून झाले भेट दिली.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळ रितपुरे, वरिष्ठ सहायक मधुकर कांबळे, संतोष साळुंके, उपसरपंच सूर्यकांत खापे, रमेश रितपुरे, विकास गायकवाड, रमेश उळगे, प्रतीक गायकवाड, शफ्यूद्दिन शेख, मच्छिंद्र कदम, ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे, आरेफ मुलानी, अंकुश गायकवाड, गोरख साळुंके, सुग्रीव खापे, अशोक गायकवाड, शुभम वाघमारे यांनी निधी दिला. शनिवारी (दि.३०) माजी सरपंच अच्युत गायकवाड व विकास कांबळे यांच्या उपस्थितीत २०० पुस्तके मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांच्याकडे दिली. जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे कार्यरत वरिष्ठ सहायक मधुकर कांबळे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शिक्षक शहाजी बनसोडे, संजय झिरमिरे, प्रमोदिनी होळे, रंजना थोरात, दिलीप पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप रोटे तर आभार सचिन तामाने यानी मानले.

बातम्या आणखी आहेत...