आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाणी भेट:शिवाजी महाविद्यालयातील वस्तू संग्रहालयास प्राचीन नाणी भेट

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या इतिहास वस्तू संग्रहालयाला महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सी. व्ही. पवार यांनी जुन्या काळातील संग्रहित केलेली नाणी भेट दिली आहेत. याप्रसंगी इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. गिरीधर सोमवंशी आणि डॉ. डी. बी. ढोबळे उपस्थित होते. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने इतिहास वस्तू संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आहे. जुन्या काळातील नाणी दैनंदिन वापरातील वस्तू पुरातन कालीन मूर्ती अशा इतिहासकालीन वस्तूंचा संग्रह या वस्तू संग्रहालयात आहे.

उमरगा परिसरातील अनेकांनी या वस्तू संग्रहालयात आपल्याकडे असलेल्या वस्तू दिलेल्या आहेत. महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख पवार यांना ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे. या छंदातूनच त्यांनी आपल्याकडे संग्रही केलेल्या जुन्या काळातील नाणी इतिहास विभागाला भेट दिली आहेत. या ऐतिहासिक वस्तू संग्रहातील वस्तू विद्यार्थ्यांना जुन्या काळातील भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी उपयुक्त ठरतील असे मत या प्रसंगी इतिहास विभाग प्रमुख डॉ. गिरीधर सोमवंशी यांनी व्यक्त केले. डॉ. सी. व्ही. पवार यांनी वस्तुसंग्रहालयाला नाणी भेट दिल्यामुळे त्यांचे आभारही मानले.

बातम्या आणखी आहेत...