आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील लाख रायाजी येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत एका तरुणाने प्रेमसंबंध प्रस्थापित केले. गेली दीड वर्षं गैरकृत्य करत मोबाइलद्वारे तिचे अश्लील फोटो, व्हिडीओ काढून रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल केले. हा प्रकार मंगळवार, ८ नोव्हेंबर २०२२ रोजी उघडकीस आला. या प्रकरणी पीडीतेने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
सविस्तर वृत्त असे की, लाख रायाजी येथील विकास पंडित राठोड (२५) याने गावातील अल्पवयीन मुलीला प्रेम प्रकरणात फसवून तिच्यावर जवळपास दीड वर्ष वारंवार अत्याचार केला. तसेच मोबाइलव्दारे तिचे अश्लील फोटो, व्हिडीओ काढले. ते फोटो, व्हीडीओ आणि रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करून अल्पवयीन मुलीची बदनामी केल्याने थेट अल्पवयीन मुलीने पोलिस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली. त्यावरून दिग्रस पोलिसांनी आरोपी विकास पंडित राठोड याच्यावर भादंवि कलम ३७६ (२) एन, ३७६ डीए, ३७६ डी, ३५४ डी, ३२३, ५०४,५०६,१०९ सहकलम ०६,१२ पोक्सो नुसार गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने, उपनिरीक्षक नरेंद्र मानकर यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.