आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीता पठण:उस्मानाबादेत गीता जयंतीनिमित्त  गांधी नगर येथे गीता पठण

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महात्मा गांधी नगर येथे श्री कुमार व्यास यांचे घरी गीता जयंतीनिमित्त श्रीमद् भगवद्गीतेचा पाठ करण्यात आला गीता पठणाच्या प्रसंगी श्यामराव दहिटणकर म्हणाले की, गीता हा ७०० श्लोकाचा ग्रंथ असून अर्जुनाला निमित्त करून रणांगणावर ही गीता सांगितली. हा गुरु शिष्याचा संवाद आहे. यात प्रामुख्याने आत्मज्ञान, आत्म्याविषयीचे ज्ञान, ब्रह्मज्ञानी पुरुषांची लक्षणे, साधकांची साधने यात विशद केलेली आहेत.

या ग्रंथाच्या अध्ययनाने पठाणाने चित्तशुद्धी होऊन साधकाला परमगती मिळू शकते. याच्या पठणाने संसाराचा ताप निघून जातो. म्हणून आपण नित्यशः एखादा अध्याय म्हणावा किंवा संपूर्ण गीतेचे पठण करावे, कुमार व्यास यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.७० पेक्षा जास्त गीता पाठकांनी यात सहभाग घेतला होता. आर. एस. कुलकर्णी यांनीही आपले अनुभव कथन केले. शेवटी सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...