आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:भूमीहिन शेतमजूर, कामगारांना दरमहा 11 हजार अनुदान द्या; अखिल भारतीय गरिबी निर्मुलन समितीचे मागणीसाठी धरणे

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूमीहिन शेतमजूर, कामगारांना दरमहा ११ हजार रुपये अनुदान देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी आखिल भारतीय गरिबी निर्मुलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी संघटनेने जोरदार आंदोलन केले. यावेळी ३० ते ४० वर्षांपासुन गावठाण किंवा गायरान शासकीय जागेत राहत असलेल्या लाभार्थ्यांना रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजनेचे बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, बांधकाम कामगारांच्या पाल्यांना थकीत असलेली शिष्यवृत्ती देण्यात येवून, नियमित दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात यावी, बांधकाम कामगारांच्या अर्जावर ग्रामसेवकांची सही व शिक्का ग्राह्य धरण्यात यावा, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर व अशासकीय निवड समिती नेमण्यात यावी, रमाई घरकुल योजनेअंतर्गत रोजगार हमीवर काम केलेल्या मजुराची मजुरी देण्यात यावी. गरीबीचे निर्मूलन करण्याचा कायदा करण्यात येवून गरीबी निर्मूलनासाठी बजेटची तरतूद करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष भाई फुलचंद गायकवाड, जिल्हासंघटक महेबूब शेख, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव वाघमारे, शहराघ्यक्ष प्रज्ञावंत ओव्हाळ, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब मस्के, बोरखेड्याचे ग्रामपंचायत सदस्य संपत गायकवाड, लक्ष्मण सरडे आदी उपस्थित होते. अनेक सोयीसुविधांअभावी भूमिहिन शेतमजूर तसेच कामगार हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांना गरीबीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी समिती प्रयत्नशील असते.

बातम्या आणखी आहेत...