आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असोसिएशनचे निवेदन:ग्रामोद्योग वसाहतीतील प्लॉटधारकांना प्लॉट विकसित करण्यासाठी मुदतवाढ द्या ; जकेकूर उद्योजक असोसिएशनचे निवेदन

उमरगा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा चौरस्ता एमआयडीसी क्षेत्रात ग्रामोद्योग वसाहतीमधील डी-१ व डी-२ या सर्व प्लॉटवर बांधकामासह बीसीसी प्राप्त करुन घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यासंबंधी जकेकूर उद्योजक असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा ग्रामोद्योग वसाहतीमधील प्लॉटधारकांना उमरगा चौरस्ता औद्योगिक क्षेत्रातील ग्रामोद्योग वसाहतीमधील प्लॉट आमच्या नावे एमआयडीसीमार्फत वाटप करण्यात आले आहेत. या प्लॉटवर बांधकाम नकाशे मंजुर करुन घेणे, बांधकाम पूर्ण करुन बीसीसी प्राप्त करुन उद्योग सुरू करण्यास महामंडळांनी फक्त दोन वर्षांची मुदत दिली होती. या प्लॉटसाठी एमआयडीसीमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा नसतानाही प्लॉट विकसीत करण्याची मुदत फक्त दोन वर्षांची देण्यात आली. त्यामुळे हा कालावधी २ वर्षांवरुन ५ वर्षांचा करावा. २०१३ पासून २०१९ पर्यंत महामंडळामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सुविधांपैकी रस्ते, लाइट, पाणी पुरवणे आवश्यक होते. परंतु २०१९ पर्यंत कोणत्याही सुविधा पुरवल्या नाहीत. त्यामुळे प्लॉट विकसीत करू शकलो नाही. सध्या विकास कालावधी संपल्याने बांधकाम परवाने घेऊ शकत नाही, त्यामुळे मुदतवाढ गरजेची आहे. तसेच एमआयडीसीकडून प्लॉट रद्द करण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाले आहेत. तरी प्लॉटवरील बांधकाम नकाशे मंजूर करून घेवून प्लॉट बांधकामासाठी बीसीसी घेण्यास मुदतवाढीसाठी वरिष्ठ स्तरावरून शिफारस करावी. निवेदनावर उद्योजक असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बिराजदार, सचिव बालाजी पवार, उपाध्यक्ष गोविंद पटेल, आनंद हिरवे, विजय तळभोगे, विजय जाधव, दिलीप गिरीबा, मनोज थोरे यांच्यासह असोसिएशन सदस्य व प्लॉटधारकांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...