आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोहारा तालुक्यातील पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी एनडीएमजे संघटनेच्या वतीने करण्यात आली. तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिमुरडीवर दुष्कर्म करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करा. वेळेत तपास पूर्ण करुन जलदगती न्यायालयात खटला चालवावा. यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करा. निवेदनावर नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी झोंबाडे, जवळा येथील माजी सरपंच नवजीवन चौधरी, काशीनाथ कांबळे, कानिफनाथ सरपने, आकाश चव्हाण, अशोक चव्हाण, पै. राहुल वाघमारे, तानाजी सोनवणे, अरविंद चव्हाण, सोहम चव्हाण, नंदकुमार चोळसे, प्रशांत गोमासे, आनंद निकाळजे आदींसह सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.