आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करा ; तुळजापुरात प्रशासनाला निवेदन

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एका गावातील सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा देण्याची मागणी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली.यासंबंधी शुक्रवारी (दि.२) उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील, पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद व तहसीलदार सौदागर तांदळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, चिमुरडीवर अत्याचाराची घटना संतापजनक व निंदणीय आहे. त्यामुळे आरोपीला कठोरात-कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. नराधमांवर कठोर कारवाई केल्यास विकृतांवर जरब निर्माण होईल. या घटनेतील नराधमाला तत्काळ शिक्षा करा. यावेळी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करण्यात आला. निवेदनावर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या श्रुती गायकवाड, श्रेया गायकवाड, प्रकाश भंडे, मनोज देवकते, अभिजित गायकवाड, सार्थक सुरवसे, राम जळकोटे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...