आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेत शहर विकास आराखड्यासंदर्भात बैठक:नळदुर्गला निसर्गाचे देणे, पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करा; नगररचनाकार नारायण कुलकर्णी यांचे आवाहन

नळदुर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शहरवासीयांनी प्रयत्न करावा. नळदुर्गला निसर्गाची देणगी लाभली आहे, याचा योग्य वापर करून शहरात पर्यटकांची संख्या आणखी कशी वाढेल, याचा प्रयत्न नागरिकांनी करावा, असे आवाहन नगररचनाकार नारायण कुलकर्णी यांनी केले. येथील नगरपालिकेत शहर विकास आराखड्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. नळदुर्ग नगरपालिका क्षेत्राकारीता विकास आराखड्याचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी शहरातील विविध घटकांकडून सूचना मागवण्याकरिता नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी गुरुवारी (दि.१) बैठक बोलावली होती. बैठकीस नगररचना अधिकारी नारायण कुलकर्णी, मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, नगर अभियंता वैभव चिंचोले उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले की, नळदुर्ग शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून निसर्ग सौंदर्यही लाभले आहे. तसेच श्री क्षेत्र रामतीर्थ, श्री खंडोबा देवस्थान, हिंदू-मुस्लिम बांधवांचे दैवत नानीमाँ दर्गाह सुद्धा येथे आहे. या सर्वांचा विकास करून शहरवासीयांनी शहराचा विकास करण्याबरोबरच शहरात व्यापार कसा वाढेल याचा प्रयत्न करावा. अतिक्रमणामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्यही नष्ट होत आहे. शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी. किल्ला परिसर विकसीत करण्यासह किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण करावे, असेही नारायण कुलकर्णी म्हणाले.

बैठकीस माजी नगरसेवक नय्यर पाशा जहागीरदार, उदय जगदाळे, बसवराज धरणे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक इस्माईल मुल्ला, संजय बताले, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, शहर भाजपाध्यक्ष धीमाजी घुगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेबूब शेख, तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याचे माजी संचालक अख्तर काजी, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, मनसेचे जिल्हा चिटणीस ज्योतिबा येडगे, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, सचिन धरणे, ज्ञानेश्वर घोडके, पद्माकर घोडके, आपचे शहराध्यक्ष वसीम पठाण, हाफेज सय्यद, नियामतुल्ला इनामदार, आपचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश राठोड, एमआयएमचे मन्सूर शेख, स्वप्निल काळे, बंडू पुदाले, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, विलास येडगे, सुहास येडगे, सुनील बनसोडे, तानाजी जाधव, दादासाहेब बनसोडे, रिजवान काजी, अबू बकर कुरेशी, मारुती बनसोडे, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...