आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन‎:काचबिंदू हा सायलेंट‎ किलर, लक्षात येत नाही‎

तेर‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण रुग्णालय तेर येथे सोमवार‎ दि.१३ मार्च रोजी जागतिक काचबिंदू‎ सप्ताहाचा शुभारंभ रुग्ण कल्याण‎ समितेचे सदस्य सुभाष कुलकर्णी‎ यांच्या हस्ते धन्वन्तरी च्या प्रतिमेचे‎ पूजन करून करण्यात आले.‎ अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिक्षिका‎ डॉ.नागनंदा मगरे होत्या.‎ नेत्रचिकित्सक डॉ.आयुब शेख यांनी‎ काचबिंदू विषयी सविस्तर माहिती‎ दिली.यावेळी अंधत्व येण्याच्या‎ कारण पैकी मोतीबिंदू खालोखाल‎ काचबिंदू हे एक कारण आहे. या‎ मध्ये रुग्णाची नजर हळूहळू कमी‎ होत असल्याने त्याची लवकर‎ जाणीव होत नाही.

त्या मुळे रुग्ण‎ डॉक्टर कडे उशिरा जातो. यात‎ रुग्णाची बरीचशी नजर कायम‎ स्वरूपी गेलेली असते म्हणून‎ काचबिंदू ला सायलेंट किलर म्हटले‎ जाते. या मुले काचबिंदूचे वेळीच‎ निदान झाले तर अंधत्व टाळता येऊ‎ शकते, असे नेत्र चिकित्सा‎ अधिकारी डाॅ. शेख म्हणाले.‎ ४० वर्षा वरील सर्व नागरिकांनी‎ आपल्या डोळ्यांची नियमित‎ तपासणी करावी असे आवाहन‎ वैद्यकीय अधीक्षका डॉ. नागनंदा‎ मगरे यांनी केले . या कार्यक्रमाचे‎ आभारप्रदर्शन शरदचंद्र कांबळे यांनी‎ केले‎ यावेळी विलास रसाळ, डॉ‎ विजय विश्वकर्मा, डॉ.शाश्वती‎ ठवरे, कार्यालयीन अधिक्षक अमोल‎ आग्रे, सहा.अधिक्षक दत्तात्रय वाघे‎ ,संतोष सरवदे शरद कांबळे,‎ अधिपरिचारिका संगिता चव्हाण‎ ,निता काळुंखे मिमोह आडसूळ,‎ गटप्रवर्तक संगिता डोलारे तसेच सर्व‎ कर्मचारी रूग्णांंची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...