आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१२ मार्च हा जागतिक काचबिंदू दिन म्हणून साजरा केला जातो. डोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणाऱ्या मुख्य मज्जातंतूला हानी पोहोचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी अधू होऊ लागते. डोळ्यांच्या अशा परिस्थितीला काचबिंदू म्हणतात. काचबिंदूची लक्षणे लवकर आढळून येत नाहीत. मात्र, जेव्हा ती आढळून येतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते, असे मत तेरच्या ग्रामीण रुग्णालयातील नेत्र चिकित्सक डॉ. आयुब शेख यांनी व्यक्त केले. १३ मार्च रोजी नेत्ररुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. वयाची चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तींना याचा धोका संभवतो. हा डोळ्यांच्या धोकादायक विकारांपैकी एक आहे.
याचे वेळेत निदान न झाल्यास उपचाराअभावी दृष्टी गमावण्याची वेळ येऊ शकते. काचबिंदूमुळे गेलेली दृष्टी परत मिळविता येत नाही. जेवढी दृष्टी शिल्लक असते, तेव्हाच काळजी घेणे अत्यावश्यक असते. या रोगाची लक्षणे इतकी सौम्य असतात की खूप काळापर्यंत लक्षातच येत नाहीत. सर्वात पहिले चिन्हं सहसा गौण दृष्टी नष्ट होणे हे आहे. यासाठी जागतिक काचबिंदू सप्ताह हा जागतिक काचबिंदू असोसिएशन आणि जागतिक काचबिंदू रुग्ण असोसिएशन यांच्यातील एक संयुक्त उपक्रम आहे. गेल्या १० वर्षांपासून हा राबविला जात आहे. जागतिक काचबिंदू सप्ताह यशस्वी करण्यासाठी आणि काचबिंदूविषयी अधिक जागरूकतेसाठी हा सप्ताह एका संदेशपूर्ण संकल्पनेसह साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना आहे ‘चला काचबिंदूवर मात करूया’. यावर्षी १२ मार्च ते १८ मार्च २०२३ दरम्यान हा आठवडा साजरा करण्यात येत आहे. १३ मार्च रोजी ग्रामीण रुग्णालयात नेत्ररूग्णात तपासणी करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.