आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:ग्लोबल वॉर्मिंग आजची‎‎ ज्वलंत पर्यावरणीय समस्या‎

‎परंडा‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लोबल वॉर्मिंग ही आजच्या‎ काळातील ज्वलंत व भयावह‎ पर्यावरणीय समस्या आहे, असे मत‎ सूक्ष्म जीवशास्त्राचे प्रोफेसर डॉ.‎ प्रशांत दिक्षित यांनी व्यक्त केले.‎ परंडा येथील रा. गे. शिंदे‎ महाविद्यालयात ‘पर्यावरण संवर्धन’‎ विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेत‎ मार्गदर्शन करताना ते बोलत होते.‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ मराठवाडा विद्यापीठ व भवानी‎ शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा‎ संचालित रा. गे. शिंदे‎ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने‎ आयोजित केलेल्या दोन दिवसीय‎ ‘पर्यावरण संवर्धन’ कार्यशाळेस‎ प्राचार्य डॉ. सुनिल जाधव, प्रा. डॉ.‎ महेशकुमार माने, प्रा. डॉ. विद्याधर‎ नलावडे, प्रा. डॉ. सचिन चव्हाण‎ आदी उपस्थित होते.

डॉ. प्रशांत‎ दिक्षित पुढे म्हणाले की, ज्या वेगाने‎ माणूस दिवसेंदिवस नवनवीन‎ तंत्रज्ञान विकसित करत आहे,‎ तेवढा तो निसर्गाला हानी पोहोचवत‎ आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल‎ राखणे आव्हान झाले आहे.‎ कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य‎ डॉ. महेश कुमार माने यांनी केले तर‎ अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ. सुनील‎ जाधव यांनी केला. यावेळी डॉ.‎ प्रकाश सरवदे, प्रा. डॉ. अतुल हुंबे,‎ प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे आदींची‎ उपस्थिती होती. कार्यशाळेसाठी‎ महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे‎ विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...