आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:प्रश्न समजल्याशिवाय अच्छे दिन येणार नाहीत; हभप प्रदीप सोळुंके महाराज यांचे प्रतिपादन

उस्मानाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात एकीकडे काळा पैसा मिळविणाऱ्यांची संख्या वाढत असताना आमच्या शेतकऱ्यांना मात्र घामाचाही दाम मिळत नाही. ही विसंगती दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना समृध्द जीवन जगण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. जोपर्यंत शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार समजून घेणार नाही, तोपर्यंत देशातील शेतकऱ्यांना सुखाचे दिवस अथवा अच्छे दिन येणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका हभप प्रदीप महाराज साेळुंके यंानी मांडली.

शिक्षक कॉलनी परिवार आयोजित गणेशोत्सवात बुधवारी सायंकाळी सोळुंके यांनी हरीकिर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे,या विषयावर विवेचन करताना सोळुंके महाराज म्हणाले, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी संसारात राहून उत्तम जीवन कसे जगायचे, याबद्दल अनमोल मार्गदर्शन केलेले आहे.तुकाराम महाराज समजून घ्यायचे असतील तर तुकारामांची गाथा प्रत्येक कुटुंबात असायलाच हवी. महाराजांच्या प्रत्येक अभंगात जगण्याचे तत्वज्ञान सापडते.माणसाने जीवनात किती आणि कसा पैसा कमवावा,याविषयी तुकाराम महाराजांच्या अभंगातून मार्गदर्शन मिळते. लहानपणी आमच्या वडिलांना काळा पैसा काय, असे विचारले तेंव्हा त्यांनी पांढराच पैसा बघितला नाही तर काळ्या पैशांची व्याख्या कशी सांगायची, असा प्रश्न केला होता.मिळविलेल्या पैशांचा सदुपयोग करा. समाजाला मदत करा, त्याची सुरूवात आपल्या घरापासूनच करा, असा सल्ला सोळंुके यांनी दिला.

मान्यवरांची उपस्थिती
सोळंुके यांच्या किर्तनसेवेसाठी कॉलनीसह परिसरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गणेश मंडळाने घेतलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोळुंके महाराजांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेश मंडळाचे प्रमुख शेखर घोडके, प्रा.शांतीनाथ घोडके, श्रीमंत पांचाळ, डाॅ.सूरज मोटे, धीरज मोटे, तुषार वाघमारे, प्रा.सुशील शेळके,बब्रुवान सुरवसे, श्याम देशमुख,स्वप्नील जाधव, सौरभ ढोबळे, सौरभ शिंदे, दीपक पांचाळ, अजय मुंडे, पृथ्वीराज मुळे, रोहित पांढरे,ओंकार गवळी,मंथन सुरवसे, गोपाळ कदम, स्वप्नील देशमुख, नामदेव ढोले, किरण सानप आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार शशीकांत देशमुख यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...