आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी सुसंस्कार आवश्यक; हरविलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी एसपी कार्यालयातर्फे मिसिंग सेल

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील महिलांना त्यांच्या दारात येऊन न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग कटीबध्द असून महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी व कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी समाजाने सुसंस्कारी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. राज्य महिला आयोगाच्या आढावा बैठकीत चाकणकर बोलत होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राज पाटील-गलांडे, प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.व्ही.अंकुश, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच.निपाणीकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधीज्ञा वैशाली धावणे आदी उपस्थित होते.

हरवलेल्या मुलींच्या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत मिसींग सेल सुरु करण्यात आला आहे. प्रत्येक गोष्टींचा पाठपुरावा त्या माध्यमातून घेतला जातो. त्यामुळे बेपत्ता झालेल्या मुलींची किंवा माहिलांची संख्या या माध्यमांतून सहज मिळवता येणे शक्य आहे, असेही चाकणकर म्हणाल्या. कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी अशा समस्या समाजापुढे मोठे आव्हान असल्याचे त्या म्हणाल्या.

१०९८ आणि ११२ हे महिलांसाठी सुरक्षा क्रमांक
विद्यार्थींनींच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी १०९८ व ११२ हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे. जेव्हा एखाद्या महिलेला आपण असुरक्षित आहोत किंवा कुठेतरी अत्याचार होतोय याची माहिती मिळताच तातडीने या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अगदी १० ते १५ मिनीटांमध्ये पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी पोहचेल व मदत करेल, त्यामुळे हा टोल फ्री क्रमांक सर्व माध्यमांतून प्रसारीत करण्याचे आवाहनही यावेळी चाकणकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...