आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Osmanabad
  • Good News For Farmers Of Latur, Osmanabad, Beed: Water Will Be Released From 'Manjara' And 'Terna' Canals From March 23, Instructions To Deliver Water To The Last Beneficiary | Marathi News

लातूर, उस्मानाबाद, बीडच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:मांजरा, तेरणाच्या कालव्यातून २३ मार्चपासून उन्हाळी आवर्तन, शेवटच्या लाभधारकापर्यंत पाणी पोहोचवण्याचे निर्देश

लातूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील मांजरा, तेरणा धरणाच्या लाभ क्षेत्रातील कालव्यामधील पाणी तूट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, जेणे करून कालव्यातून शेवटच्या लाभधारकापर्यंत पाणी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज कालवा समितीच्या बैठकीत पाटबंधारे विभागाला दिले.

येत्या 23 मार्चपासून उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात यावे, असा निर्णय कालवा समितीत सदस्यांच्या संमतीने घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही बैठक पार पाडली.

कालव्याचे पाणी सुरुवाती पासून (Head) ते शेवट पर्यंत (Tail) पोहचविण्यासाठी ज्या मनुष्यबळाची आवश्यकता लागते, त्या मनुष्यबळासाठी कंत्राटी पद्धतीने भरण्याची मान्यता शासनाने दिली असून त्या बाबत तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले. पाणी पुरवठा संस्था, शेतकरी यांच्या तक्रारी, समस्या सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यालय असावे अशाही सुचना देशमुख यांनी यावेळी दिल्या.

बैठकीला न येता, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा

पाणी पुरवठा समिती सदस्यांनी बैठकीला न येता, जलसंपदा विभागाच्या कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात या कार्यालयाशी समन्वय साधून त्यांच्या अधिकारी यांच्याशी चर्चा करुन समन्वय ठेवून अडचणींवर मात करावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसेच जिल्ह्यात इतर पिकासोबतच सोयाबीन, तूर, हरभरा, ऊस या पिकांचे उत्पादन अधिक घेतले जाते. शेतकऱ्यांच्या शेतीच्या अनुषंगाने पाणीपट्टी वसुलीबाबत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी पुढाकार घेवून वसुली करण्यासाठी कारखान्यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा व समन्वय साधून नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याबाबतचे नियोजन करावे. जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीच्या वसुलीबाबत हप्ते करून त्यांचे नियोजन करून पुढील कार्यवाही करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

पाणीपट्टी वसुलीसाठी नाविण्यपूर्ण प्रयोग करा

जलसंपदा विभागासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हास्तरावर निधी मिळणार आहे, त्यासाठी आराखडा, प्रस्ताव सादर करावेत. पाणीपुरवठा समिती सदस्यांना भेटणे, त्यांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी अधिकारी यांनी एक-दोन महिन्यातुन एकदातरी भेट घ्यावी, त्यांच्या सूचनांवर काय कार्यवाही झाली ते सांगावे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी अनाधिकृतपणे पाणी वापरावर कायदेशीररित्या कार्यवाही करण्यासाठी जलसंपदा विभागाला मदत करावी. जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्यासाठी व वसुलीसाठी गुगल शीट तयार करुन, अशा प्रकारचा एखादा नाविण्यपूर्ण प्रयोग करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून शेतकरीही पाणीपट्टी भरण्यासाठी पुढाकार घेतील व सामोरे येतील.

पाण्याच्या अनाधिकृत वापरावर बंधने

पावसाळ्यात तलाव पाण्याने भरुन आल्यानंतर तलावातील वाहून जाणारे पाणी साठवता येते का तेही पाहावे. तेरणा-मांजरा या नद्यांना महापूर आला की, पाणी मागे येते व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकाचे नुकसान होते. यावर जलसंपदा विभागाने अभ्यास करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा. तसेच तावरजा-मांजरा येथील पाण्याच्या (प्रेशर) दाबासंदर्भात जलसंपदा मंत्री यांच्यासमवेत राज्यस्तरावर बैठक घेवून यासंदर्भात योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. तसेच मायनर तलावासाठी नवीन चाव्या बसवाव्यात जेणेकरुन पाण्याचा अनाधिकृत वापरावर बंधने येतील, यासंदर्भात प्रयत्न करण्यात यावा.

शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थानी पाणी बिलाची थकबाकी भरावी. ज्या विभागाची अडचण आहे त्या विभागाची संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन त्यावर तोडगा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...