आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिष्ठापना:आज गौराईंचे आगमन; सजावटीसह पूजा साहित्य, दीपमाळांची खरेदी

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी (दि.३) घरोघरी गौराई विराजमान होत आहेत. हळदी-कुंकवाचे सडे घालत गौराईंची घराघरांत प्रतिष्ठापना होते. पूर्वसंध्येला तोरण, दीपमाळांसह अन्य सजावटीचे साहित्य खरेदीसाठी शुक्रवारी (दि.२) महिलांनी बाजारपेठेत मोठ्या संख्येने गर्दी केली होती.गौराईंचे सुबक, रेखीव, अलंकारयुक्त मुखवटे उपलब्ध झाले आहेत. चैत्रागौरीसारखी आरास गणपती गौरींपुढेही करण्यात येते. लाडू, चकल्या, करंज्या आदी फराळाची रेचचेल असते. काही ठिकाणी नुसते मुखवटे ठेवण्यात येतात, काहींच्या घरी बैठ्या गौरी आहेत तर काहींच्या घरी उभ्या महालक्ष्मी असतात. यंदा गतवर्षीच्या तुलनेत सर्वच साहित्याच्या किंमती २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तरीही सजावटीच्या साहित्याची विक्री होत असल्याने व्यापाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. विद्युत रोषणाईसाठी १० रुपयांच्या माळेपासून दीड हजारापर्यंची माळ उपलब्ध आहे. वेगवेगळ्या रंगाचे बल्ब, कापडी फुलासह इतर साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. दोन वर्षानंतर बाजारपेठेतही अलोट गर्दी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...