आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदी:शासकीय हरभरा खरेदी वाढीव मुदतीचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन ; हमी भाव खरेदी केंद्र सुरू केली होती

तेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाफेडच्या वतीने खरेदी करण्यात येत असलेल्या हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासनाने १८ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असून वाढीव मुदतीत शेतकऱ्यांनी हरभरा खरेदी नोंदणी करून वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उस्मानाबाद तालुका शिवसेना प्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी केले आहे. २०२१-२२ मधील उत्पादीत हरभरा हमीभाव देऊन खरेदी करण्यासाठी शासनाने हमी भाव खरेदी केंद्र सुरू केली होती. परंतु मुदत संपल्याने शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी बंद केली होती उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मुदतीत हरभरा खरेदी मुदतीत आँनलाइन करता आली नव्हती .त्यामुळे अनेक शेतकरी हमी भाव योजनेचा लाभ घेता आला नाही. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आ. कैलास घाडगे पाटील यांनी शासनाने वाढीव मुदत देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने १८ जूनपर्यंत हरभरा खरेदी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या वाढीव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आहे.

बातम्या आणखी आहेत...