आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सरकारला 8 वर्षे पूर्ण, 13 जूनपर्यंत कार्यक्रम ; भाजयुमोच्या वतीने रॅली काढून सरकारचे कार्यक्रम पोहोचवणार

उस्मानाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आठ वर्ष पूर्तीनिमित्त ७ ते १३ जून या कालावधीत सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त धाराशिव येथील प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालयात युवा मोर्चाचे मराठवाडा समन्वयक अरुण पाठक, जिल्हा प्रभारी अमोल निडवदे, जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय व योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन सर्वांनी केले. ही सुशासन व्यवस्था देशभर केवळ भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमुळेच देशाला मिळाली असल्याचे सांगून युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विकास तीर्थ बाईक रॅलीमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवाव्यात असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही सप्ताह कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या परंडा ते तुळजापूर विकास तीर्थ बाईक रॅलीबाबत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच धाराशिव भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्य अहवाल या बैठकीमध्ये सांगितला. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आ.राणाजगजितसिंह पाटील व सुजितसिंह ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली भारतील जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हयातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थावर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करतील व संघटन मजबुत करतील असे आश्वासक विचार मांडले. विकास बाईक रॅलीची सुरुवात परंडा तालुक्यातून होणार असल्याची माहिती देण्यात आली.

श्री.पाठक यांनी माहिती सांगतांना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २०१४ साली केंद्रात आल्यानंतर विविध लोककल्याणकारी निर्णय आणि योजना राबविल्या आहेत. श्रीराम मंदिराचा सर्वांच्या आस्थेचा प्रश्न चुटकीसरशी निकाली लावला. प्रधानमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात मदत करण्याचे काम निरंतर सुरू आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची अंमलबजावणी करुन माता-भगिनींना चुलीच्या धुरामुळे दमा, डोळ्यांचे आजार यापासून मुक्ती देण्याचे काम केले आहे. आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मुद्रा लोन, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, अटल पेन्शन योजना अशा कितीतरी योजनांचा लाभ आज सर्वसामान्यांना मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...