आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैलास पाटील यांचे उपोषण:अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 59.87 कोटी मंजुरीचा शासन निर्णय

उस्मानाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याला अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी आणखी ५९.८७ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार असून याचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार कैलास पाटील यांनी केलेल्या उपोषणाचे हे यश असल्याचा दावा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला. तसेच आपल्या पाठपुराव्यामुळे हे यश आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगून आणखी २२२.७३ कोटींचा आणखी शासननिर्णय येणार असल्याचेही सांगितले.

खरीप २०२२ मध्ये जुन ते ऑगस्ट कालावधीत अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी २४५ कोटी अनुदान जिल्हयाला प्राप्त झाले होते. याचे शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील वितरण झालेले आहे. यानंतर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अशाचप्रकारे झालेल्या नुकसानीपोटी २८२ कोटीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी ५९.८७ कोटी मंजुरीचा शासन निर्णय बुधवारी निर्गमीत झाला आहे.

३३० कोटी रुपयांसाठी संयुक्त होणार बैठक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार राणा पाटील यांनी चर्चा केली. यात विम्याचे उर्वरित ३३० कोटींसाठी महसूल व कृषी मंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचे ठरले. केंद्र व राज्य सरकारला अनुक्रमे ८६ कोटी व १३४ कोटी अनुज्ञेय असून ही रक्कम जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आणून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे अपेक्षित आहे, उर्वरित ११० कोटीची वसुली थेट विमा कंपनीकडून करण्याची प्रक्रिया आणखीन गतिमान करणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच योजनेच्या नियमावली प्रमाणे अंदाजे २२ टक्के व्याजाची रक्कम विमा कंपनीकडून वसूल करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे सुचीत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...