आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन:लोककला, पोवाड्यंाच्या माध्यमातून‎ शासकीय योजनांची होतेय ओळख‎

नारंगवाडी‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत‎ सामाजिक न्याय विभागामार्फत‎ राबवण्यात येत असलेल्या शासकीय‎ योजनांचा लोकगीत, पोवाडा, बतावणी,‎ भारुड व गोंधळ आदी पारंपारिक‎ लोककलेच्या माध्यमातून गावात जागर‎ करण्यात येत आहे.‎ जिल्हा माहिती कार्यालयातर्फे‎ आयोजित या कार्यक्रमांना ग्रामीण भागात‎ चांगला प्रतिसाद मिळत आहे. योजनांची‎ माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवून‎ विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी‎ प्रोत्साहित करण्यासाठी लोककला‎ पथका द्वारे तालुक्यातील गावांमध्ये मार्च‎ पासून जनजागृती मोहिम सुरुवात‎ करण्यात आली आहे.

‎याच अनुषंगाने शासनानच्या‎ अनुसूचित जाती उपयोजना २०२२-२३‎ अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या‎ विविध योजनाची लोककलेच्या‎ माध्यमातून पसिद्धी करण्यात येत आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ माडज येथे जनजागृती जिल्हा माहिती‎ उपविभागीय अधिकारी युवराज पाटील‎ अन जिल्हा माहिती कार्यालयाच्या‎ मार्गदर शनाखाली हे कार्यक्रम झाले.‎

तुळजापूरच्या महिषासुरमर्दिनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सांस्कृतिक लोककला मंच कला‎ पथकाचे प्रमुख शाहीर राजेंद्र गायकवाड‎ आणि मंडळींनी बुधवारी रात्री माडज‎ गावात कोणत्या योजना आहेत यांची‎ माहिती दिली. त्या सर्व योजना समजेल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अशा भाषेत मिराताई गायकवागायकवाड, लक्ष्मण‎ देडे, तानाजी देडे, विजय मोरे, रामचंद्र‎ ढेकळे, दिलीप कोल्हे, करण कांबळे,‎ भैरु डवरी, हनुमंत मोरे या कलाकारांनी‎ उपस्थितांना दिली.‎

बातम्या आणखी आहेत...