आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जि.प., पं.स. निवडणूक समाेर ठेवून गटबांधणी

कळंब3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गट बांधणीसाठी ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाचा असल्याने राजकीय मंडळीनी गावागावांत लक्ष घातले. काही तरुणांना राजकीय करिअरला सुरुवात करण्यासाठी ग्रामपंचायत चांगला प्लॅटफॉर्म असल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.कळंब तालुक्यात ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पारावर निवडणूक चर्चा रंगल्या. कोणता पक्ष-पार्टी या अटीतटीच्या निवडणुकीत बाजी मारणार? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

पूर्वी गावातील गटा-तटाच्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत अलीकडच्या काळात पक्षीय राजकारण शिरल्याचे निदर्शनास येत आहे. आपल्या विचारांच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळावी, गाव ताब्यात असल्याने विकासकामांच्या निमित्ताने लोकांशी चांगला संपर्क राहतो. आपल्या विचारांचे कार्यकर्ते, आपला गट मजबूत होतो. त्यामुळे भविष्यातील सर्वच निवडणुका सोप्या होऊन जातात. या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पक्षातील मुख्य नेतेमंडळी ग्रामपंचायत निवडणुकीत आपापल्या कार्यकर्त्यांना राजकीय बळ देताना दिसत आहेत.

बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार केला असता, ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीला गांभीर्याने घेत असल्याचे दिसत आहेत. पुढील काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. त्यावेळी गावा गावात आपला गट सक्षम असावा, गावातील ग्रामपंचायत ताब्यात असल्यावर आणखीन फायदा होईल, या विचाराने गावातील नेत्यांनी ही निवडणूक अस्तित्वाची केली आहे.

राजकीय करिअरसाठी ग्रामपंचायत चांगला प्लॅटफॉर्म
राजकीय करिअरला सुरुवात करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक चांगला प्लॅटफॉर्म आहे. विशेषत: युवक वर्ग या निवडणुकीकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. भविष्यातील राजकारणात नेतृत्व करण्याची संधी मिळेल, या अपेक्षेने गटासाठी पडेल ती जबाबदारी एकनिष्ठपणे सांभाळत निवडणुकीत पळत असतो.

मात्र, ऐन निवडणुकीत उमेदवारी देताना एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे नाव गायब झाले आहे. काही गावांमध्ये विशेष मर्जीतील पण ‘हो ला हो’ म्हणणाऱ्यांना उमेदवारी देण्यासाठी तर ‘यालं कोण ओळखतयं’ असे वातावरण करून निष्ठावंतांचे पंख छाटण्यात आल्याचे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कळंब तालुक्यात पाहावयाला मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...