आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुबलब पाणी साठ्यामुळे यंदा गतवर्षाच्या तुलनेत गव्हाचा पेरा वाढत असून २६ हजार ९२५ हेक्टरवर झाला आहे. तसेच कमी पाण्यावर येणाऱ्या हरभऱ्याचा पेरा २ लाख २५ हजार ८४७ हेक्टरवर गेला आहे. जिल्ह्यात १५ डिसेंबरपर्यंत ९६.८० टक्के पेरणी झाली आहे. पेरणीला उशिर झाल्याने अल्पावधीत येणाऱ्या हरभऱ्याची पेरणी सर्वाधिक झाली आहे. खरीप हातचा गेल्याने शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर असल्याने पाण्यासह खत अन् कीटकनाशकाची फवारणी केली जात आहे.
जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांची काढणी करण्यासाठी एक महिना उशिर झाला. काढणीनंतर पाणी साचल्याने शेतीची मशागत करण्यास अडचणी आल्या. यामुळे १५ डिसेंबरपर्यंत ९६. ८० टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. यंदाही रब्बीच्या पेरणीला एक महिना उशिर झाला आहे. मात्र, मुबलक पाणी असल्याने हरभऱ्यासह गहू, ज्वारीची पेरणी वाढली आहे. यंदा गतवर्षाच्या तुलनेत गव्हाचा पेरा १० हजार हेक्टरने वाढला आहे. गतवर्षी १६ हजार हेक्टर पेरणी झाली होती. यंदा २६ हजार ९२५ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. तसेच सर्वाधिक हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
बहुतांश शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे. उशीरा पेरणी होत असल्याने बहुतांश शेतकरी हरभऱ्याची पेरणी केली आहे. तसेच कमी कालावधीत येणारे सुर्यफुल, जवस, करडईची पेरणीही वाढत आहे. सध्या सुर्यफुल, जवस व करडईला भावही चांगला मिळत आहे.
यामुळे शेतकरी या पिकांकडे वळले आहेत. कोरडवाहू जमिनीत सुर्यफूल सर्वाधिक घेतले जाते. कृषी विभागाच्या वतीने यंदा जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ४ लाख ११ हजार १७० हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. त्यापैकी १५ डिसेंबरपर्यंत ३ लाख ९८ हजार ३३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापैकी २ लाख २५ हजार ८४७ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. तसेच १ लाख २७ हजार ७३१ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली. सूर्यफुल, जवस, करडईची पेरणी झाला आहे.
हरभरा पिवळा पडत आहे
रब्बी हंगामातील ज्वारीसह अन्य पिकांना वातावरण पोषक आहे. मात्र, सुरूवातीला पेरलेल्या हरभऱ्यावर किडरोग दिसत आहे. काही भागातील हरभरा पीक पिवळे पडून वाया जाण्याची शक्यता आहे. उत्पन्नातील घट टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडून महागड्या कीटकनाशकाच्या फवारण्या करण्यात येत आहे.-उत्तम कोकाटे, मोहा, ता. कळंब.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.