आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बेंबळी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या अपहाराच्या चौकशीचा अहवाल देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याने येथील ग्रामपंचायत सदस्य पुन्हा उपोषण करणार आहेत. मागील उपोषणावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी हमीपत्र देऊनही अहवाल दिला नाही. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात म्हटले आहे की, बेंबळी ग्रामपंचायतमध्ये मोठ्या अपहार झाला आहे.
याबाबत सातत्याने तक्रारी दाखल करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे १९ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल देणार असल्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भात ३१ डिसेंबरला चौकशी करण्यात आली. परंतु, चौकशी अहवाल देण्यासाठी गटविकास अधिकारी टाळाटाळ करत असून ते राजकीय दबावात आहेत. अनेक वेळा तोंडी व लेखी विनंती करून चौकशी अहवाला आम्हाला दिला जात नाही. साततत्याने विविध कारणे दाखून टाळाटाळ केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.