आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र शासानाच्या पारित केलेल्या विधवा प्रथा बंदी कायद्याची तालुका कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायती व शहरात त्वरीत अंमलबजावणी करण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) करण्यात आली.
यासंबंधी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत देश विज्ञानवादी, प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढणे आदी प्रथांचे पालन केले जाते. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार करत शासनाने राज्यात सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी शासन परिपत्रक जारी केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुक्यात विधवा प्रथा बंदीचा पहिला ठराव कलदेव निंबाळा ग्रामपंचायतीने घेतला आहे. आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व ग्रामपंचायती आणि शहरांमार्फत त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी व विधवा महिलांना सन्मानित करण्यात यावे. निवेदनावर जिजाऊ ब्रिगेडचे शहराध्यक्षा संध्याताई शिंदे, सचिव लताताई भोसले, जिजाऊ ब्रिगेड प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष सुनंदाताई माने, माजी सचिव मीराताई चव्हाण, संघटक श्रीदेवी बिराजदार, पूजा सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्षा रेखाताई पवार, मीनाक्षीताई दुबे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
अधिकारांचे हनन नको राजर्षी शाहू महाराजांनी विधवांसाठी केलेल्या कार्याची जाण म्हणून क्रांतिकारी निर्णयाचा ठराव कलदेव निंबाळा ग्रामपंचायतीने घेतला आहे. या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी महिला संघटनांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. एखादी अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक असून शासनाने संपूर्ण राज्यात विधवा प्रथा बंदी कायदा राबवण्याचे आवाहन केले आहे. विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवा प्रथांचे पालन होत असल्याने भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये. - रेखाताई सूर्यवंशी, प्रवक्त्या, जिजाऊ ब्रिगेड.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.